नवनाथ हे हिंदू धर्मातील नाथ संप्रदायातील नऊ महान योगी मानले जातात. नाथ परंपरेची सुरुवात आदिनाथ म्हणजेच भगवान शिव यांच्याकडून झाली असे मानले जाते. नवनाथांनी योग, तपश्चर्या आणि अध्यात्माच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन केले. त्यांनी हठयोग आणि कुंडलिनी जागृतीचा प्रसार केला. नवनाथांची नावे प्रदेशानुसार थोडी बदलतात, पण मुख्य नावे अशी मानली जातात: मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, नागनाथ, चर्पटीनाथ, भर्तरीनाथ आणि रेवणनाथ. मच्छिंद्रनाथ हे नाथ परंपरेचे प्रमुख गुरु होते. गोरक्षनाथांनी नाथ संप्रदायाचा व्यापक प्रसार केला. नवनाथांनी चमत्कार, सिद्धी आणि आत्मज्ञान यांद्वारे लोकांमध्ये श्रद्धा निर्माण केली. महाराष्ट्रात नवनाथांची परंपरा विशेषतः लोकप्रिय आहे आणि अनेक भक्त त्यांची पूजा करतात. नवनाथांची कथा “नवनाथ भक्तिसार” या ग्रंथामध्ये सविस्तर वर्णन केलेली आहे.
नवनाथांची आरती:
जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा हो, स्वामी नवनाथा ।
भावार्ते आरती ओवाळू आरती श्रीगुरुदेवदत्ता ॥ जयदेव जयदेव ॥ धृ ॥
कलियुगी अवतार नवनाथांचा । केलासे उद्धार भक्तजनांचा ।
दावीला मूळमार्ग शाबरी विद्येचा । आगळा महिमा न कळे स्वामी सिद्धांचा ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा हो, स्वामी नवनाथा ।
भावार्ते आरती ओवाळू आरती श्रीगुरुदेवदत्ता ॥ जयदेव जयदेव ॥
मच्छीपासूनि झाले स्वामी मच्छिंद्र । गोरक्ष जन्मले गोवर भस्मात ।
जालंदर उत्पत्ति यज्ञकुण्डात । कानिफ पैदास गजकर्णात ॥ २ ॥
जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा हो, स्वामी नवनाथा ।
भावार्ते आरती ओवाळू आरती श्रीगुरुदेवदत्ता ॥ जयदेव जयदेव ॥
जयाचे चरणापासूनी झाले चर्पटीनाथ । गहिनी गोपीचंद अडबंगनाथ ।
हरिणीने रक्षिले भर्तरीनाथ । पुढे चौर्यांशी सिद्धांचे गणित ॥ ३ ॥
जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा हो, स्वामी नवनाथा ।
भावार्ते आरती ओवाळू आरती श्रीगुरुदेवदत्ता ॥ जयदेव जयदेव ॥
कलीमध्ये नवनाथ प्रकटले । शाबरीविद्या देऊनि जग उद्धरिले ।
विद्येच्या प्रतापे सुरवर जिंकिले । नाथांच्या सेवेशी शरणागत आले ॥ ४ ॥
जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा हो, स्वामी नवनाथा ।
भावार्ते आरती ओवाळू आरती श्रीगुरुदेवदत्ता ॥ जयदेव जयदेव ॥
Navnathanchi Aarti:
Jaidev Jaidev Jai Shri Navanatha ho, Swami Navanatha
Bhavarte aarti ovaloo aarti Shri Gurudev Datta. ॥ Jaidev Jaidev ॥ Dhru ॥
Kaliyugi avatar Navanathancha, Kelase uddhar bhaktajananchaa
Davila moolmarg Shabari vidyecha, Agala mahima na kale Swami Siddhancha. ॥1॥
Jaidev Jaidev Jai Shri Navanatha ho, Swami Navanatha.
Bhavarte aarti ovaloo aarti Shri Gurudev Datta. ॥ Jaidev Jaidev ॥
Machhipasun jhale Swami Machhindranath, Goraksh janmale govar bhasmat
Jalandar utpatti yagnakundat, Kanif paidasa gajkarnat ॥2॥
Jaidev Jaidev Jai Shri Navanatha ho, Swami Navanatha.
Bhavarte aarti ovaloo aarti Shri Gurudev Datta. ॥ Jaidev Jaidev ॥
Jayache charanapasuni jhale Charpatinath, Gahini Gopichand Adbangnath
Harinin rakshile Bhartarinaath, Pudhe chauryanshi Siddhanche ganit. ॥3॥
Jaidev Jaidev Jai Shri Navanatha ho, Swami Navanatha.
Bhavarte aarti ovaloo aarti Shri Gurudev Datta. ॥ Jaidev Jaidev ॥
Kalimadhe Navanath prakatle, Shabari vidya deuni jag uddharile
Vidyechya pratape survar jinkile, Nathanchya seveshi sharanagat ale. ॥4॥
Jaidev Jaidev Jai Shri Navanatha ho, Swami Navanatha.
Bhavarte aarti ovaloo aarti Shri Gurudev Datta. ॥ Jaidev Jaidev ॥
वरील आरती व्यतरिक्त नवनाथांच्या आणखी आरत्या प्रसिद्ध आहेत. पण वर दिलेली नवनाथांची आरती ही सर्वात प्रचलित आणि सर्वाधिक गायली जाणारी आहे. आणखी दोन आरत्या खाली दिल्या आहेत.
नवनाथांची आरती क्र. २:
जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा ।
भक्तगण उद्धरी देऊन सिद्ध करा ।। धृ० ।।
मच्छिंद्र गोरख तैसे जालिंदरनाथ ।
कानिफ गहिनीनाथ नागेशसहित ।
चर्पटि भर्तरी रेवण मिळुनी नवनाथ ।
नवनारायण अवतार संत ।। जय० ।। १ ।।
भक्तिशक्ती बोधावैराग्यहित ।
तापत्रय ते हरिती स्मएकचित्त ।
नमने चरित्र पठणें दुरितांचा अंत ।
भक्तजनासी तारी नवनाथ खचित ।। जय० ।। २ ।।
इहपर साधुनि देति समस्त नवनाथ ।
भूत समंधा प्रेता घालविती सत्य ।
भक्तजनांचे पुरवा तुम्हीच संकल्प ।
कृपार्थ होता दावा सदानंदरूप ।। जय० ।। ३ ।।
दुःखी दीन दरिद्री लोकांना तारा ।
देऊनि सुख संपत्ति मुक्ती दोहि करा ।
स्मरण करावे आता नित्य नित्यनाथा ।
शरणगत मी तुमच्या पायी मम माथा । जय० ।। ४ ।।
नवनाथाचि आधार सकलांना आता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ।
ब्रह्म सनातन शांति देई मम चित्ता ।
शरण विनायक लोटांगण आता ।। जय० ।। ५ ।।
नवनाथांची आरती क्र. ३:
मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदरनाथ, कानिफा, चीरंगी, अडबंगीनाथ l
रेवण, चरपटी, गहिनी नि वटसिद्धी l भर्तरि आणि मीननाथ ll १ ll
जयदेव जयदेव जय नवनाथा l
आरती स्वीकारावी प्राज्ञीकवंता ll धृ.ll
जन्म आपुला अयोनिसंभव l
त्यांत श्रीदत्तात्रेय अनुग्रह l
तेणें प्रसन्न केली देवतें l
संपादिली सर्व विद्याअस्त्रांतें ll जय.ll २ ll
त्या महान विद्याअस्त्रांतें l
केले हो सुखी सकल जनांसी l
चौर्र्याएंशी सिद्ध करुनी l
दत्त पंथाचा हा नाथ पंथाचा हो वाढविला महिमा ll जय.ll ३ ll
चरणांसी एकचि नम्र विनंती, बाळांवरी ठेवा कृपादृष्टी l
नवनाथ ! नवनाथ ! करिता धावा l
तारूनि न्यावे या बालकांना ll जय.ll ४ ll
Download Navnathanchi Aarti PDF: