
Pasaydan is a universal prayer for the welfare of human beings. It was written by Saint Dnyaneshwar, a renowned saint and poet who lived in Maharashtra in the 13th century. Pasaaydaan is written in Marathi and is very popular in Maharashtra. The language used is somewhat difficult to comprehend for the new generation, as it is very old and the meaning of some words is unclear.
The Meaning of the Word Pasaydan:
The word Pasaydan means “the act of donation that frees one from bonds or attachments”. The word “Pasay” comes from the Sanskrit word “Pasa,” which means bond or attachment, and “Daan” means donation.
Pasaydan in Marathi:
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

Pasaydan In English:
Aata vishwatmake deve
yene vaagyagye toshaave
Toshoni maj dyaave
Pasaydan he
Je khalanchi vyankati sando
Taya satkarmi rati vaadho
Bhootaan paraspare pado
Maitra jivache
Duritanche timir jaavo
Vishwa swadharma surye paaho
Jo je vanchhil to te laaho
Pranijaata
Varshat sakal mangali
Eeshwar-nishthanchi maandiyaali
Anavarat bhoomandali
Bhettu bhootaan
Chalaa kalpatarunche aarav
Chetana chintamani che gaav
Bolte je arnav
Piyushache
Chandrama je alankshan
Martand je taapheen
Te sarvanhi sada sajjan
Soyare hotu
Kimbahuna sarva sukhi
Poorn hou-ni tinhihi loki
Bhajijo aadipurukhi
Akhandit
Aani granthopajiviye
Visheshin lokin iye
Drushta-adrushta vijaye
Hoaave ji
Yeth mhane Shri Vishweshwarao
Ha hoil daan pasaavo
Yene vare Jnanadevo
Sukhiya jala
Pasaydan Meaning in Marathi:
आता विश्वात्मक देवाने, या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान ( प्रसाद ) द्यावे. ॥ १ ॥
दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो, त्यांना सत्कर्मे करण्या मध्ये स्वारस्य वाढो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो. ॥ २ ॥
पापी माणसाचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. ॥ ३ ॥
सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत. ॥ ४ ॥
जे (संत) कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारूपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत, ॥ ५ ॥
जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत. ॥ ६ ॥
तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी. ॥ ७ ॥
हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे, त्यांनी या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे. ॥८ ॥
यावर विश्वेश्वर गूरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले. ॥ ९ ॥
Pasaydan in Marathi PDF – पसायदान मराठी PDF:
I am curious to understand the possible reason for using the word “Kimbahuna”.. thoughts?
“किंबहुना” या शब्दाचा अर्थ “त्याहूनही अधिक”, “अगदीच”, “खरं तर”, किंवा “म्हणजेच” असा होतो.
हा शब्द एखाद्या विधानाला अधिक ठामपणे, जोर देऊन सांगण्यासाठी वापरला जातो — म्हणजे आधी जे सांगितले आहे, त्यापेक्षाही पुढचं विधान अधिक प्रभावी किंवा उच्च आहे हे दाखवण्यासाठी.
आता या ओळीमध्ये अर्थ पाहूया:
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
याचा अर्थ असा:
खरं तर (किंबहुना) तिन्ही लोकांतील सर्व सुख प्राप्त होतात,
जे अखंडपणे आदिपुरुषाची (भगवंताची) भक्ति करतात।
म्हणून:
“किंबहुना” येथे अर्थ —
“त्याहूनही अधिक”, “खरं तर”, “अगदीच” असा आहे.
यामुळे वाक्याचा भावार्थ असा होतो की —
“जो आदिपुरुषाची अखंड भक्ति करतो, तो तिन्ही लोकांतील सर्व सुखे प्राप्त करून पूर्ण सुखी होतो — किंबहुना, त्याहूनही अधिक आनंदी होतो.”