Navnath Bhaktisar Adhyay 4

By Rahul | Last updated on January 28, 2021

Navnath Bhaktisar Adhyay 4 is the fourth chapter of the book. This Adhyay is beneficial to get freedom from vicious plots and defeat enemies.

Navnath Bhaktisar Adhyay 4:

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी करुणानिधे ॥ आगमअगोचर विशाळबुद्धे ॥ सकळमुनिमानसहदयवृंदे ॥ उद्यान वाटे आनंदाचें ॥१॥ हे योगिमानसरजनी ॥ पंढरीशा मूळपीठणी ॥ पुंडलिकाचे आराध्य स्वामिणी ॥ उभी अससी विटेवरी ॥२॥ सौम्य दिससी परी नीटक ॥ बहुत ठक चित्तचालक ॥ भक्तमानसभात्रहारक ॥ छिनाल सुकृत उरों नेदीं ॥३॥ पहा कैसी बकासमान ॥ नासाग्रभागीं दृष्टी देऊन ॥ कोणी म्हणेल गरीबावाण ॥ चांगुलपण मिरवीतसे ॥४॥ परी ही अंतरीची खुण ॥ न रहरि मालू एकचि जाणे ॥ भक्तीविषयीं लंपट वासना ॥ मनामाजी हुटहुटी ॥५॥ सुकर्म हदया घालूनि हात ॥ युक्तिप्रयुक्ती काढूनि घेत ॥ पुढें पुढें होऊनि कार्यार्थ ॥ आपुले त्या संपादी ॥६॥ पहा दामाजीचें दायधन ॥ गटकन गिळिलें अभिलाषून ॥ कंगालवृत्ती सोंग धरुन ॥ देव महार झाला असे ॥७॥ नरहरि सबळ सुवर्णकर्म ॥ तयाच्या विषयीं वरिला काम ॥ भांडावें तों जन्मोजन्म ॥ शिवमौळी राहातसे ॥८॥ कुब्जादादुला वांकुडातिकुडा ॥ नाहीं म्हणे तिला झाला पुंडा ॥ वृंदा पुरुषही जाडा ॥ स्मशानवस्ती केलीसे ॥९॥ ठकवोनि मारिला काळयवन ॥ सोळा सहस्त्र दादुला होऊन ॥ शेवटीं न पावे समाधान ॥ ब्रह्मास्थिती वरिलीसे ॥१०॥ चक्षुगोचर होत जें जें ॥ तें मागूं शके अति निर्लज्जें ॥ सुदामाचें पृथुक खाजे ॥ कोरडें न म्हणे सहसाही ॥११॥ काय वरिला मृत्यु दुकाळानें ॥ द्रौपदीची खाय भाजीपानें ॥ हात वोडवूनि लाजिरवाणें ॥ मिटक्या मारुनि भक्षीतसे ॥१२॥ शबरीचीं बोरें उच्छिष्ट पाहून ॥ न म्हणे भक्षी मन लावून ॥ चोखियाचा पदार्थ गोड पाहून ॥ र्हभदासहित सारीतसे ॥१३॥ नामा बाळ ठकवूनि त्वरित ॥ नैवेद्य भक्षित हातोहात ॥ तस्मात् किती दुर्गुणांत ॥ सदगुणातें आणावे ॥१४॥ असो ऐसे परम ठकणी ॥ येऊनि बैसली ग्रंथश्रेणी ॥ मम चित्तातें समूळ घेऊनी ॥ पायांपासीं ठेवीतसे ॥१५॥ असो तिचे वरदेंकरुन ॥ श्रोते ऐका आतां कथन ॥ श्रीमच्छिंद्र योगीं पूर्ण ॥ हिंगळाकारणीं संचरला ॥१६॥ मागिल अध्यायीं कथन ॥ मच्छिंद्र मारुतीचें युद्ध होऊन ॥ शेवटीं प्रीति विनटून ॥ हिंगळाख्यस्थाना पावले ॥१७॥ ती ज्वाळामुखी भगवती ॥ महाप्रदीप्त आदिशक्ति ॥ तेथें जाऊनि द्वाराप्रती ॥ मच्छिंद्रनाथ पोचले ॥१८॥ तंव तें द्वार पाहतां क्षितीं ॥ उंच बाहु सार्धशत ॥ औरस चौरस षडशत ॥ विराजलेसें द्वार तें ॥१९॥ तें द्वारीं प्रचंड ॥ अष्टभैरव महाधेंड ॥ त्यांनीं नाथपंथ पाहुनि वितंड ॥ चित्तांत कामना उदेली ॥२०॥ नागपत्रअश्वत्थठायीं ॥ मच्छिंद्रनाथ हा गोसावी ॥ नेमाचरणीं विद्याप्रवाहीं ॥ प्रसन्न केलें देवातें ॥२१॥ तरी शाबरीविद्याकवित ॥ येणें केलें वरदस्थित ॥ तपीं तें प्रांजळ कायस्थ ॥ केवीं झाले तें पाहूं ॥२२॥ ऐसा काम धरुनि पोटीं ॥ युद्धरीतांच्या सुखालोटों ॥ अष्टही भैरव एकथाटीं ॥ प्रत्यक्ष झालें द्वारातें ॥२३॥ अंगें नेमूनि संन्यासरुपा ॥ देहपंकजा दावूनि तदूपा ॥ म्हणती महाराजा योगदीपा ॥ कोठें जासी तें सांग ॥२४॥ येरु म्हणे शक्तिदर्शन ॥ घेणें उदेलें अंतःकरण ॥ तरी तुम्ही आहांत संन्यासधाम ॥ तुम्हां जाणें आहे कां ॥२५॥ तंव ते म्हणती जोगिया ऐक ॥ आम्ही येथेंचि स्थायिक ॥ भगवतीकाजा वरदायक ॥ द्वारपाळ म्हणवितों ॥२६॥तरी येथें कामनास्थित ॥ दर्शनार्थ कोणी येत ॥ तरी पापपुण्य पुसोनि त्याप्रत ॥ मार्गापरी योजितसों ॥२७॥ अगा पुमांसा प्राणी शब्दरचनें ॥ दिसूनि येतां चित्तकामनें ॥ त्या प्रसादूनि अंबादर्शनें ॥ सिद्ध करितो महाराजा ॥२८॥ आणि पापकलह अर्थ धूर्जटी ॥ आमुतें दिसूनी येता दृष्टी ॥ त्यासी मागे परतवूनि राहटी ॥ तो पुरुष दर्शनासी मिरवेना ॥२९॥ तस्मात् वागोत्तराचे देठी ॥ प्रसाद मिरवला हो शेवटीं ॥ तरी त्वत्कामना उदेली पोटीं ॥ अंबादर्शनीं मिरवावें ॥३०॥ तरी महाराजा योगद्रुमा ॥ पापपुण्यांचा झाडा आम्हां ॥ दर्शवोनि दर्शन कामा ॥ स्वस्थ करीं रतिसुखा ॥३१॥ अंतरीं आला अर्थकंदर्प ॥ येथें करितां कांही लोप ॥ तरी संचार करितां द्वारमाप ॥ मध्ये अटक महाराजा ॥३२॥ द्वार सांकडें होतें अतिसान ॥ गुंते करितां अनृत भाषण ॥ मग त्यातें मागें ओढून ॥ पूर्ण शिक्षा दावितों ॥३३॥ तस्मात् तुमची कर्मराहटी ॥ झाली जैसी महीपाठीं ॥ तीतें दर्शवूनि वागदिवटी ॥ दर्शनातें दर्शिजे ॥३४॥येरु म्हणे द्वारस्थ बापा ॥ आम्ही नेणों पुण्यपापा ॥ कर्मसुकर्म अर्थकंदर्पा ॥ ईश्वरी अर्थी केलें असे ॥३५॥ जैसेया लहराभास ॥ उभय नातळे त्या सुखास ॥ हर्षदरारा सावधपणास ॥ ठायीं ठायीं मुरतसे ॥३६॥ तो नौका सरितातोयी जात ॥ दों थडीं रुख दिसती पळत ॥ दों थडींचा बा एक साक्षिवंत ॥ रुखा पळ नेणेचि ॥३७॥ कीं तो व्यक्त बहू घटक्षितीं ॥ अंतरदिवटा बहु गभस्ती ॥ परी त्याची सदा दीप्ती ॥ नयनीं मिरवे महाराजा ॥३८॥ तुटूनि नीतिपुण्यद्रुमा ॥ आम्ही नेणों पाउली उगमा ॥ तंव ते म्हणती नरेंद्रोत्तमा ॥ बोल बोलसी हे काय ॥३९॥ जगीं जन्मोदय देह धरिल्या पोटीं ॥ कर्माकर्म उभे राहटी ॥ मिरवले हे प्रपंचहाटीं ॥ पदार्थसवें हे दोन्ही ॥४०॥ तरी बा तयाच्या गृहकपाटीं ॥ ना तळपे ना मिरवे शक्ती ॥ तरी आतां लोपूनि कर्माप्रती ॥ अर्थ तुझा सरेना ॥४१॥ जैसें वेचिल्यावांचूनि धन ॥ नातळे कदा हाटींचे कण ॥ तरी कर्माकर्म जल्पल्याविण ॥ अर्थ तुझा सरेना ॥४२॥तरी प्रांजळवचनप्रवाही ॥ कामसरिता मिरविल्याही ॥ तेणें दर्शनें अंबापायीं ॥ संगमातें मिरवेल ॥४३॥ नातरी गौन धरुनि पोटीं ॥ वदतां अर्थ न लाघे जेठी ॥ प्रांजळ वद कीं शेवटी ॥ फिरुनि जाशील माघारा ॥४४॥ तुवां प्रांजळ वदल्याविण ॥ करुं न देऊं तुझें गमन ॥ बहुचावटी जल्पल्यान ॥ शिक्षा पावसी येथें तूं ॥४५॥ ऐसें ऐकतां मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे शासनी उदेला आदित्यसुत ॥ तेथें तुमची शक्ति अदभुत ॥ केवीं वर्णूं मशक हो ॥४६॥ जो महाप्रळय भद्ररुद्र ॥ तो ग्रासूनि बैसला मुखचंद्र ॥ तेथें तुमची कथा महींद्र ॥ काय असे मशक हो ॥४७॥ ऐसी ऐकतां मच्छिंद्रगोष्टी ॥ परम क्रोधाची झाली दाटी ॥ मग ते अष्टभैरव थाटी ॥ एकदांचि उठावले ॥४८॥ जैसें अपार विधानथाटी ॥ अबळां सांडूनि उबलाकोटी ॥ प्रदीप्त होऊनि सांगे गोष्टी ॥ महाखगीं जाऊनियां ॥४९॥ तन्न्यायें अष्टभैरव ॥ मांडिते झाले युद्धपर्व ॥ कोणी त्रिशूळ परशु गांडीव ॥ टणत्कारिले ते समयीं ॥५०॥

तो परजोनि असिलता ॥ मुदगलगुरु ज्या परमकठिणता ॥ अंकुश बरची मांडू अस्ता ॥ चक्रें चालती उद्देशें ॥५१॥ गदा दारुकायंत्र अचाट ॥ भाले गुप्ती कुठार बोथट ॥ ऐशीं शस्त्रें तीव्र अचाट ॥ करीं कवळूनि उठावले ॥५२॥ तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ भस्मझोळीं वोपिला हस्त ॥ जय जय श्रीगुरुराजदत्त ॥ म्हणूनि भस्म करीं कवळूनि ॥५३॥ दाही दिशा मंत्रगौरव ॥ विभूती चर्चूनि आपुला भाव ॥ म्हणे मित्रावरुणदेव ॥ सिद्ध असोत मम काजा ॥५४॥ अश्विनी वरुण आंग्न वात ॥ धरामरादि वज्रनाथ ॥ गण गंधर्व तरंगिणीवत ॥ सिद्ध असोत आम्हांतें ॥५५॥ बुद्धिसिद्धि योगी अपार ॥ ब्रह्मांडात नांदणार ॥ त्या सर्वातें नमस्कार ॥ साह्य असोत आमुतें ॥५६॥ ऐसी जल्पूनि मंत्रशक्ती ॥ प्रेरिता दृढ झाली विभूती ॥ युद्धसमारंभ क्षिती ॥ आमंत्रिलें सर्वासी ॥५७॥ मग वज्रपंजर प्रयोगभूती ॥ धरास्त्रें नेमूनि शक्रदैवतीं ॥ मंत्रप्रयोग सबळशक्ती ॥ भाळीं विभूती चर्चीतसे ॥५८॥ तेणें शरीर वज्राहून ॥ ते समयीं झालें अतिकठिण ॥ मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण ॥ कार्य साधा आपुलें ॥५९॥ यावयातें कराल आळस ॥ तरी मातृपितृशपथेस ॥ गुरु धिक्कारुनि निर्बळ यश ॥ मुखा काळें कराल कीं ॥६०॥ मग जिणें संदेहरुपी ॥ मिरवणें येथें मम कंदर्पी ॥ उडी सांडूनि कोरडे कूपीं ॥ प्राण त्यजावा हें बरेंच ॥६१॥ ऐसी ऐकतां वज्रपाणी ॥ पेटला सबळ जेवीं अग्नी ॥ मग शस्त्रें शिखा नाथविधानीं ॥ कवळूं पाहती ग्रासावया ॥६२॥ जे अष्टभैरव भद्रकाळ ॥ शस्त्रें सोडिती उतावेळ ॥ म्हणे येथें यांचा काळ ॥ चिताभस्मीं मेळवा ॥६३॥ मग नाथशरीरा लक्षूनि अष्ट ॥ शस्त्रें प्रेरिती प्रहार अनिष्ट ॥ त्रिशूळ फरश ते नीट ॥ दणादणीत अंगातें ॥६४॥ अंकुश परज गूर्ज मुदगर ॥ मांडू गदा भालचक्र ॥ गुंफी खंजीर बरची असिल ॥ सबळ प्रहारें भेदिती ॥६५॥ परी तो शस्त्रें मच्छिंद्रनाथ ॥ तृणप्राय सकळ मानीत ॥ शखवृष्टी घन वर्षत ॥ मच्छिंद्र पर्वत झालासे ॥६६॥ ऐसें होतां ते अवसरी ॥ निर्विघ्न दिसती ते शस्त्र ॥ मग परम कोपें गांडीवास्त्र ॥ सज्ज करिते पैं झाले ॥६७॥ एकी निर्मिला वातशर ॥ दुजीं निर्मिला कामास्त्र तीव्र ॥ तिजे निर्मिले वासव अस्त्र ॥ महाशक्ती आगळी ते ॥६८॥ चौथीं योजिलें नागास्त्रबंधन ॥ जें महातक्षकाहूनि दारुण ॥ पांचवें ब्रह्मास्त्र प्रवीण ॥ शापादपि विराजे ॥६९॥ सहावें रुदाख प्रळयकाळ ॥ कीं भक्षूं पाहे ब्रह्मांड सकळ ॥ सातवें दानवास्त्र सबळ ॥ असंख्य राक्षस मिरवती ॥७०॥ आठवें कृतांतास्त्र कठिण ॥ प्रेरितां पावती मृत्यु काळ नाम ॥ प्रचंड हस्तपाश कवळून ॥ असंख्य स्थिती मिरविती ॥७१॥ ऐसे योजूनि गांडीवा गुणी ॥ प्रेरिते झाले अष्टही क्षणीं ॥ मग ते अस्त्र भ्रमतां गगनीं ॥ प्रळयकाळ वोढवला ॥७३॥ वातास्त्राची प्रळयगती ॥ महापर्वत स्वर्गपंथी ॥ वायुचक्रीं भ्रमण करिती ॥ अकीं कार्पास जेउता ॥७४॥ कामास्त्र परम कठिण ॥ उर्वशीचें चांगुलपण ॥ अन्य दारा करवीत गमन ॥ मच्छिंद्रजती ये कृती ॥७५॥ त्याही परम सुंदर खाणी ॥ पाहतां काममूर्च्छनीं ॥ देव दानव मानव ध्यानीं ॥ जपी तपी लागती ॥७६॥ वासवशक्ती अतिप्रौढी ॥ तेज प्रवेशतां पडे ब्रह्मांडीं ॥ मित्रता पाहूनि घालणें उडी ॥ उरली नाहीं मागुतीं ॥७७॥ ती शक्ती होतां प्रगट ॥ शब्द करी कडकडाट ॥ तेणें उचलूं पाहे ब्रह्मांडपीठ ॥ धराकंप दाटला ॥७८॥ शेष दचकला आपुले मनीं ॥ उंचावीतसे ग्रीवा मूर्धनी ॥ कूम पृष्टा सरसावूनी ॥ भयें कांपे चळचळां ॥७९॥ वराह उंचावोनि दंत ॥ म्हणे धरा होती रसा व्यक्त ॥ दिग्गज भयभीतचित्त ॥ सैरा धांवती दशदिशां ॥८०॥ अस्त्रें नोहे प्रळय अचाट ॥ कीं प्रळयरुद्राचा हळहळाट ॥ विमानयानीं पाहे सुभट ॥ त्या पळतां समजेना ॥८१॥ तेज पाहतां सत्य अदभुत ॥ गंधर्व झाले मूर्च्छागत ॥ तार तारांगण होत ॥ चंद्र लपवी मुखाते ॥८२॥ सूर्य वरुणा करी दाटी ॥ म्हणे राहें खगापोटीं ॥ वगीं प्रळय जेठी ॥ जगामाजी मिरवला ॥८३॥ शिव झाला भयातुर ॥ रक्षा कपाटें गिरिकंदर ॥ ऐसा प्रळय होतां अपार ॥ ठायीं ठायीं पडताती ॥८४॥ त्यांत नानास्त्र विषवल्लीसरणी ॥ प्रगटतां विषाची प्रेरणी ॥ अघटित तेथें जाहली करणी ॥ आली विपाची मूर्च्छना ॥८५॥ होतां ब्रह्मास्त्र शापादिक ॥ त्यांत प्रवेशला रुद्रास्त्र पावक ॥ तो क्षणें जाळूं पाहें सकळिक ॥ ग्रासीन म्हणे ब्रह्मांड ॥८६॥ त्यातें साह्यार्थ दानवास्त्र झालें ॥ भयानक बहुधा रक्षक धांवले ॥ तैशांत काळास्त्र परम शिरलें ॥ प्राण हरुं लोकांचा ॥८७॥ ऐसी प्रळयाची होतां मांडणी ॥ मच्छिंद्र देखतां नयनीं ॥ मग नव अस्त्रशक्तिमंत्र जपूनी ॥ विभूतीतें सोडीतसे ॥८८॥ तेणें अस्त्रविचक्षणीं ॥ कैसे ऐका प्रतापखाणी ॥ वातअस्त्राचे पुढे जाऊनी ॥ पर्वता्स्त्र विराजलें ॥८९॥ यावरी कामास्त्रापुढें जाऊनी ॥ संचरलें अस्त्र विरक्त धडपडूनी ॥ तेणें कामास्त्र बापुडें होऊनी ॥ पाठी देऊनि पळतसे ॥९०॥ वासवशक्ति अतिदारुण ॥ तियेचे पुढें झालें मोहन ॥ तेणें महंता गेली पळून ॥ वासवशक्तीची सर्वस्वें ॥९१॥ नागास्त्राचे पडिपाडीं ॥ खगेंदास्त्र घाली उडी ॥ सकळ नागाची जुपडी ॥ दाढेखाली रगडी तें ॥९२॥ यावरी ब्रह्मास्त्र प्रळयानळ ॥ यास्तव अस्त्र उरों नेदी केवळ ॥ शांति वरुण वाचे सफळ ॥ आशीर्वचन नाथातें ॥९३॥ यावरी रुद्रास्त्र उरों नेदी केवळ ॥ तयापुढें धाडिलें कार्तिकेयास्त्र बाळ ॥ येतांचि सर्व अंग झालें शीतळ ॥ कोप शांताब्धींत बुडाला ॥९४॥ दानवास्त्रा नाहीं मिती ॥ त्याची मच्छिंद्राचें देवास्त्र करी शांती ॥ सकळ त्यातें पाहूनि जाती ॥ अंतरिक्षस्त्रानीं आपल्या ॥९५॥ यावरी काळास्त्र गहन ॥ तेणें संजीवनी अस्त्र पुढें पाहून ॥ मागोमागें पाश घेऊन ॥ निर्लज्जपणें पळताती ॥९६॥ ऐशी अष्टांची अष्टनिवृत्ती ॥ करुनि पावली सकळ शांति ॥ यावरी जें अस्त्र उरलें नववे मिती ॥ तयाची ख्याती परिसावी ॥९७॥ तें वातास्त्र अर्कप्रचंड ॥ प्रवेश करितां भैरवपिंड ॥ तेणें विकळ झाले अष्टधेंड ॥ चलनवलन विसरले ॥९८॥ प्रथम वासव शक्ति प्रगट होतां ॥ दणाणा उठला ब्रह्मांडी समस्तां ॥ तो प्रळयनाद अंबा ऐकतां ॥ परिचारिका धाडीतसे ॥९९॥ त्या परिचारिका एकएकाकिनी ॥ कोटी चामुंडा लावण्यखाणी ॥ शंखिनी डंखिनी योगिनी ॥ जळदेवता पातल्या ॥१००॥

चंडा रंडा मुंडा कुंडा ॥ मंडा वंडा आणि वितंडा ॥ ऐशा वर्णिल्या किती तोंडा ॥ अष्टराष्ट्री धांविन्नला ॥१॥ परी पूर्वी पांचसती ॥ समाचारा आल्या असती ॥ त्यानी पाहुनि प्रळयगती ॥ सकळ समुदाय तो आणिला ॥२॥ त्याही चमुंडा तीव्र थोर ॥ शस्त्रास्त्रीं करिती मार ॥ परी तो सुभट मच्छिंद्र ॥ निवारीत अस्त्रानें ॥३॥ असो वातास्त्रआकर्षणी ॥ अष्टभैरव गेले क्षीण होऊनी ॥ प्राण विकळ देह धरणीं ॥ निचेष्टित पडियेले ॥४॥ यारीव एक क्षणीं चामुंडाभार ॥ तयांचा कैसा झाला विचार ॥ भुलीक मोहनास्त्र ॥ कामशरीं योजिलें ॥५॥ तंव तें अस्त्र प्राबल्यवंत ॥ सर्वाच्या संचरलें देहीं गुप्त ॥ तेणें क्षणैक होऊन मूर्च्छित ॥ पिशाचासमान भ्रमताती ॥६॥ कोणी वाद्यें घेऊन नाचती ॥ कोणी उगीच टाळ्या पिटिती ॥ कोणी खगीं तंद्री लाविती ॥ कोणी हंसती गदगदां ॥७॥ कोणी म्हणती विमान आलें ॥ कोणी उग्याच डोलती डोले ॥ कोणी धांवती महीं पाउलें ॥ पळतां उलथोनि पडताती ॥८॥ कोणी उगेचि स्फुंदोनि रडती ॥ कोणी गोंधळी गायन करिती ॥ कोणी रानोरान भ्रपती ॥ आई बया म्हणोनि ॥९॥ कोणी लोळती धुळींत ॥ कोणी मृत्तिका उधळीत ॥ कोणी उदो उदो म्हणत ॥ कोणी रडतां पडताती ॥११०॥ कोणी निचेष्टित पडतां धरणीं ॥ मक्षिका गोंगाट करिती वदनीं ॥ कोणी उग्याच शिव्या देऊनी ॥ विवाद करिताती नेपुरें ॥११॥ कोणी भेटती दाटती प्रेमें ॥ कोणी काष्ठाचि उभवूनी सप्रेमें ॥ नाना खेळ स्त्रिया उगमें ॥ पुरुषनांवीं होताती ॥१२॥ कोणी फेडूनि नेसतें वसन ॥ वृक्षा नेसविती गुंडाळून ॥ कोणी कवळूनि करीं पाषाण ॥ स्तनपान करिती त्या ॥१३॥ कोणी काढूनि चोळी चिंधोटी ॥ त्याची नेसती लंगोटी ॥ अंगा चर्चूनि भस्मचिमुटी ॥ भोपळा नरोटी कवळूनियां ॥१४॥ कोणी ऊर्ध्व करोनि हस्त ॥ अलख म्हणोनि भिक्षा मागत ॥ कोणी शृंगार काढूनि निश्वित ॥ पाषाणांते लेवविलें ॥१५॥ ऐसा होता चमत्कार ॥ त्यांत काय करी नाथ मच्छिंद्र ॥ विद्यागौरवी प्रहर ॥ तयामाजी संचरवीं ॥१६॥ तें अस्त्र चपळ सबळवंत ॥ वसनें आसडूनि त्वरित ॥ नेऊनियां गगपंथें ॥ अंबरातें मिरविलीं ॥१७॥ मग त्या सकळ नग्न होऊनी ॥ नृत्य करिती सकळ अवनीं ॥ त्याही सकळ आणि मच्छिंद्रमुनी ॥ मायास्त्रातें जल्पतसे ॥१८॥ तेणेंकरुनि अपार पुरुष ॥ सर्वभूषणीं महादक्ष ॥ निर्मूनियां नाथ प्रत्यक्ष ॥ समोर संचार करवीतसे ॥१९॥ ऐसी करुनि दृढ राहटी ॥ स्मरणास्त्र जल्पलें होटीं ॥ तेणेंकरुनि सर्व गोरटी ॥ देहाप्रती पातल्या ॥१२०॥ देहस्मरणीं होता स्थित ॥ आपण आपणाकडे पहात ॥ तो नग्नशरीरी केश मुक्त ॥ परम लज्जित मग त्या झाल्या ॥२१॥ भोंवतें पाहती दृष्टी करुनी ॥ तों अपार पुरुष देखिलें नयनीं ॥ तेणें फारच लज्जित होऊनी ॥ पळती सैराट नग्नचि ॥२२॥ तों पळतपळत सहज नयनीं ॥ भैरव पाहिले अनवस्थान ॥ कंठीं उरलासे प्राण ॥ रुधिर अवनीं सांडतसें ॥२३॥ आणिक पाहिलें नेत्रश्वेतीं ॥ मग पळूनि गेल्या जेथें भगवती ॥ अंबिका पाहूनि नग्न समस्ती ॥ आश्चर्य चित्तीं करीतसे ॥२४॥ म्हणे कां वो ऐसें केलें ॥ कोणी तुम्हांतें नागाविलें ॥ येरी म्हणती सुकृत संपलें ॥ म्हणूनि अवस्था हे झाली ॥२५॥ माय वो माय जोगी आला ॥ कोणीकडोनि जाणों आम्ही त्याला ॥ तेणें करुनि अवस्था आम्हांला ॥ प्राण घेतला भैरवांच ॥२६॥ आतां जननी काय उरलें ॥ तुम्ही स्वस्थान सोडा वहिले ॥ नातरी दशा पूर्ण पावाल ॥ आम्हां दिसतें जननीये ॥२७॥ भैरवांसारिखे वार धुरंधर ॥ तयांचा प्राण कंठावर ॥ उरला असे बरावा विचार ॥ आम्हांलागीं दिसेना ॥२८॥ तो जोगी नव्हे मायाजननी ॥ सुत प्रसवला दुसरा तरणी ॥ पूर्वभयाची आतां मांडणी ॥ जगामाजी मिरवेना ॥२९॥ की एकादश प्रळयरुद्र ॥ एकच शरीरीं मिरवले भद्र ॥ देवदानव नक्षत्र चंद्र ॥ आम्हां वाटलें ग्रासितो ॥१३०॥ कीं माये प्रळयविजेच्या स्थानास ॥ आजीच आली धरुनि यास ॥ आप तेज मही वायु आकाश ॥ ग्रासील ऐसें वाटतसे ॥३१॥ तरी आतां वेगीं माये ॥ या स्थानातें आंचवावे ॥ कोणे प्रकारें वांचवावें ॥ जीवित्व आपुलें जननीये ॥३२॥ ऐसें बोलूनी भयभीत ॥ कंपायमान बावर्याव होत ॥ कोणी बोलतां चांचरा घेत ॥ आला आला म्हणोनि ॥३३॥ ऐसी दीक्षामाय भवानी ॥ पाहूनि आश्वर्य करी मनीं ॥ मग स्वचित्तांत पाहे शोधूनी ॥ कोण कोणाचा कोणता ॥३४॥ तंव तो महाराज कविनारायण ॥ उपरिचर वसूच प्रियनंदन ॥ मच्छिंद्रनामें अवतार धरुन ॥ जगामाजीं मिरवला ॥३५॥ ऐसें आणूनी स्वचित्तांत ॥ मग सकळांलागीं वसनें देत ॥ पुढें घालूनि अबला समस्त ॥ बाहेर आली जगतत्रयजननी ॥३६॥ मग मच्छिंद्रापाशीं येऊनि त्वरित ॥ बहु प्रेमानें हदयीं धरीत ॥ तेणें पाहूनि जगन्मातेतें ॥ चरणावरी लोटला ॥३७॥ मग घेऊनि अंकीं मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे बा प्रताप केला बहुत ॥ तरी भैरव प्राणरहित ॥ झाले सावध करीं त्यांसी ॥३८॥ ऐसें ऐकूनि अंबिका वाणी ॥ प्रसन्न झाली चित्तभवानी ॥ मग अस्त्रविद्या वाताकर्षणीं ॥ काढूनि घेतली ते समयीं ॥३९॥ जैसें दुग्धामाजी तोय ॥ काढुनि घेत हंस समयीं ॥ तेवीं वाताकर्षण अस्त्र सदयी ॥ काढूनि घेत ते क्षणीं ॥१४०॥ कीं पंचाक्षरी कौशलेप्रती ॥ मही मांदुसे काढूनि घेती ॥ तन्न्यायें विद्याशक्ती ॥ काढूनि घेत तो नाथ ॥४१॥ किंवा स्वबुद्धिविचक्षण ॥ कार्यं असतां परस्वाधीन ॥ तें युक्तिप्रयुक्तीं घेती करुन ॥ प्राज्ञ बळें आपुलालें ॥४२॥ असो ऐसे दृष्टांत बोलें ॥ येरीकडे भैरव सावध झाले ॥ चलनवलन सर्व संचरलें ॥ जैसे तैसें शरीर ॥४३॥ मग झाल्या विचक्षणीं ॥ दिशा पाहती दृष्टीकरुनी ॥ तों जगन्माता अंकीं घेऊनी ॥ मच्छिंद्रातें बैसली ॥४४॥ मग ते अष्ट भैरववीर ॥ येते झाले अंबिकेसमोर ॥ म्हणती अंबे प्रताप थोर ॥ मच्छिंद्रानें पै केला ॥४५॥ आम्ही याची युद्धमांडणी ॥ घेऊं सकळ परीक्षाकडसणी ॥ मग नागपत्रअश्वत्थाहुनी ॥ कथा बदले अंबेतें ॥४६॥ गअश्वत्थाहूनि ऐकतां गोष्टी ॥ माता म्हणे हा धन्य धूर्जटी ॥ मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टीं ॥ प्रताप कांहीं दावी कां ॥४७॥ जैसें पयामाजी तोय ॥ शोषूनि घेत हंस पय ॥ तेवीं आतां युद्धसंदेह ॥ काढूनि दावीं चक्षूतें ॥४८॥ यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ कैसी दावूं कोणत्या अर्थ ॥ माता म्हणे हा पर्वत ॥ आकाशातें मिरवी कीं ॥४९॥ मिरवेल परी जेथील तेथ ॥ पुन्हां ठेवीं मूर्तिमंत ॥ ऐसें ऐकतां मच्छिंद्रनाथ ॥ करीं कवळी भस्मातें ॥१५०॥ मग वायुअस्त्र फणिदैवत ॥ मंत्रजल्पें केलें युक्त ॥ पर्वतीं फेकितां भस्म होत ॥ उदयवातचि जो झाला ॥५१॥ वात मौळी कद्रुनंदन ॥ पर्वत मौळी शीघ्र वाहून ॥ वातचक्रीं करी भ्रमण ॥ चंडरथासमान कीं ॥५२॥ त्यांतें उलथावया शक्ती ॥ अंबा पाहे आपुल्या चित्तीं ॥ परी शेषमौळींची पर्वतमाती ॥ दृढ असे ढळेना ॥५३॥मग मनीं म्हणे हा धन्य नाथ ॥ जेणें ऐक्य केला पर्वत वात ॥ शत्रु समरीं ऐक्य चित्त ॥ मिरविलाही हें धन्य ॥५४॥ पर्वत पूर्ण वातावरी ॥ तो वात मिरवी घेऊनि शिरीं ॥ जैसा मत्स्यकोदरीं ॥ येवोनिया दडाला ॥५५॥ कीं व्याघ्रअजानांदवटी ॥ नांदविले एका पेटीं ॥ कीं उरग उरगारी सांगती गोष्टी ॥ प्रेमभावें मिरवूनियां ॥५६॥तन्न्यायें मच्छिंद्रें केलें ॥ धन्य सद्विद्येचें धाम रचिलें ॥ मग कुरवाळूनि म्हणे वहिलें ॥ पर्वतातें उतरीं कां ॥५७॥ मग मच्छिंद्रें वात आकर्षून ॥ ठायींच्या ठायीं नग उतरुन ॥ ठेवूनी अंबेचे समाधान ॥ सद्विद्येनें पैं केलें ॥५८॥ यावरी नाथ आणि भगवती ॥ गेले अंबिकास्थानाप्रती ॥ तेथें राहूनि तीन रात्री ॥ पुसूनियां चालिले ॥५९॥ मग अंबा प्रसन्न होऊन ॥ अस्त्रें दिधलीं त्यातें दोन ॥ स्पर्शास्त्र अस्त्र भिन्न ॥ प्रसादातें निवेदिलेम ॥१६०॥ असो ऐसा प्रसाद घेऊन ॥ निघता झाला मातेसी नसून ॥ बारामल्हारांचा मार्ग धरुन ॥ जाता झाला तो नाथ ॥६१॥ पुढें बारामल्हारांचें कथन ॥ श्रोतियां सांगे धुंडीनंदन ॥ नरहरि मालू नामाभिधान ॥ जगामाजी मिरवे तो ॥६२॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चतुर्थोध्याय गोड हा ॥१६३॥ श्रीकृष्णार्पमस्तु ॥ ॥ नवनाथभक्तिसार चतुर्थोध्याय समाप्त ॥

If You Like This Article, Then Please Share It

DISCLAIMER:

The information on this website is for informational purposes only. We do not guarantee the accuracy of the content.

All views expressed are personal and should not be considered professional advice. Please consult a qualified expert for guidance.

We are not responsible for any actions taken based on the information provided here.