Navnath Bhaktisar Adhyay 9 | PDF Download

By Rahul | Last updated on January 5, 2026

Navnath Bhaktisar Adhyay 9 is the ninth chapter of the book. Reading this Adhyay helps you to be a master of 64 arts and 16 techniques. The PDF download link is at the end of the article.

Navnath Bhaktisar Adhyay 9:

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी जगदुद्वारा ॥ अवतारदीक्षाज्ञानेश्वरा ॥ अघटितमायावतारधरा ॥ भिंतीवाहना गुरुराया ॥१॥ रेड्यामुखीं वेदोच्चार ॥ करुनि तोषविले सकळ विप्र ॥ फोडोनि भगवदगीताभांडार ॥ सकळ जनां वाढिलें ॥२॥ ऐसा तूं कविमहाराज ॥ तरी मम कामनेचें धरुनि चोज ॥ ग्रंथार्थी विपुल सुरस ॥ वैखरीतें वदवीं कां ॥३॥ मागिले अध्यायीं कथा सुरस ॥ दिधली भाक मच्छिंद्रास ॥ वर देऊनि वातचक्रास ॥ गमन करिता पैं झाला ॥४॥ आणि श्रीरामाची झाली भेटी ॥ तेणेंही वर ओपूनि शेवटीं ॥ पाशुपतरायाची रामाचे पोटीं ॥ कामना संतुष्ट केली मच्छिंद्र ॥५॥ असो आतां येथूनि मच्छिंद्रनाथ ॥ सप्त मोक्षपुर्यर पाहूनि त्वरित ॥ अयोघ्या मथुरा अवंतिका यथार्थ ॥ काशी काश्मिरी पाहिलीं ॥६॥ मिथिला प्रयाग गया सुग्ग ॥ तेथें नमूनि विष्णुपदास ॥ अन्य तीर्थे करुनि बंगालदेश ॥ चंद्रागिरीस तो पातला ॥७॥ गांवांत करितां भिक्षाटन ॥ तों सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण ॥ तयाचे दृष्टी पडतां सदन ॥ झालें स्मरण भस्माचें ॥८॥ मनांत म्हणे याच सदनीं ॥ पुत्रमंत्रसंजीवनी ॥ वरदभस्मी सिद्ध करुनी ॥ दिधली होती निश्वयें ॥९॥ तरी ती साध्वी विप्रजाया ॥ सरस्वती नामें होती जया ॥ सर्वोपकारी दयाळ द्विजभार्या ॥ सुकृत होतें तियेचें ॥१०॥ तरी द्वादश वर्षे लोटल्यापाठीं ॥ पुन्हां मी येईन शेवटीं ॥ ऐसें वदोनि भस्मचिमुटी ॥ सरस्वतीतें दीधली असे ॥११॥ तरी त्या मायेचा शोध करुन ॥ पाहूं तियेचा वरदनंदन ॥ ऐसें हदयीं मच्छिंद्र आणून ॥ सदनामाजी प्रवेशला ॥१२॥ उभा राहूनि विप्रांगणीं । हे सरस्वति ऐसी पुकारी वाणी ॥ तंव ती ऐकूनि शुभाननी ॥ बाहेर आली अति त्वरें ॥१३॥ येतां देखिला योगद्रुम ॥ मग भिक्षा घेऊनी उत्तमोत्तम ॥ म्हणे महाराजा भिक्षान्न ॥ झोळीमाजी स्वीकारीं ॥१४॥ मच्छिंद्र म्हणे वो शोभननी ॥ तव नाम काय तें ऐकूं दे कानीं ॥ येरी म्हणे सरस्वती अभिधानी ॥ लोकोपचारें मज असे ॥१५॥ उपरी मच्छिंद्र बोले तीतें ॥ नाम काय तव भ्रतागतें ॥ येरी म्हणे सर्व त्यातें ॥ दयाळपती म्हणताती ॥१६॥ नाथ म्हणे तुम्ही कवण जाती ॥ गौड विप्र म्हणे ती तैं सरस्वती ॥ ऐसें ऐकूनि खूण चित्तीं ॥ मिळाली तेव्हां नाथाच्या ॥१७॥ मच्छिंद्र म्हणे माये ऐक ॥ दावीं कोठे तव बाळक ॥ येरी म्हणे जी पुत्रमुख ॥ पाहिले नाहीं अद्यापि ॥१८॥ मच्छिंद्र म्हणे बोलसी कां खोटें ॥ म्यां वरदभस्माचीं दिधली चिमुट ॥ भस्म नोहे तें संजीवनीपीठ ॥ पुत्ररुपींचें दर्शवी ॥१९॥ दाखवी परी तो पुत्र कैसा ॥ अजरामर मागें सोडिला कैसा ॥ तेजःपुंज अन्यून अनिळ महेशा ॥ ऐसा पुत्र असेल कीं ॥२०॥ असो भस्मचिमुटी ऐकतां वाणी ॥ खूणयुक्त झाली नितंबिनी ॥ परी भस्मचिमुटीतें उकिरडाभुवनीं ॥ सांडिले अन्याय वाढला ॥२१॥ तेणेंकरुनि जाहली भयग्रस्त ॥ हदयीं संचरला कंपवात ॥ चित्तीं म्हणे आतां हा नाथ ॥ शिक्षा करील मजलागीं ॥२२॥ नेणों शापें करील भस्म ॥ कीं तोडील स्वशक्तीनें माझा काम ॥ कीं तरुरुप हो ऐसा शाप देऊन ॥ सांडूनि जाईल अवनीतें ॥२३॥ आधी मी अल्पबुद्धीपासुनी ॥ घेतल्या आहेत नितंबिनीवाणी ॥ कीं कानफाट्याची विपरीत करणी ॥ अविद्यार्णवी असती ते ॥२४॥ नाटक चेटक कुडे अपार कपट ॥ जाणती दुर्गुण परम पापिष्ट ॥ जाया पाहूनि उत्तम बरवट ॥ स्तुती करिती तियेची ॥२५॥ दिनमानपर्यत कुत्री ॥ उत्तम जया करिती रात्रीं ॥ मग शयनीं घेऊनि शेजपात्रीं ॥ भोग भोगिती दुरात्मे ॥२६॥ ऐसें पूर्वी मज श्रुत ॥ सखियामुखीं श्रवण केलें होतें ॥ परी तोचि बोल समस्त ॥ सत्य होऊं पाहतसे ॥२७॥ तरी आतां कपाळ फुटकें ॥ होणार ते होऊ शके ॥ कानफाट्या करुनि चेटकें ॥ दशा करील कीं माझी ॥२८॥ तरी यातें कवण उपाय ॥ कांहीं सुचेना करुं काय ॥ हा ओळख धरुनि समय ॥ साधूनि आला परतोनि ॥२९॥ ऐसे रीतीं मनीं जल्पत ॥ तरी गात्रें थरथरा कापत ॥ अत्यंत भयाचें भरुनि भरतें ॥ शुद्धि पात्रा सोडिलें तिनें ॥३०॥ यावरी नाथ म्हणे वो जननी ॥ पाहसी काय तूं पिशाचपणीं ॥ पुत्र कोठें तो दावी नयनी ॥ उशीर न लावीं वो माते ॥३१॥ ऐसिया बोलाची होतां दाटी ॥ मग विचारी हदयी गोरटी ॥ कीं यासी वदावी खरी गोष्टी ॥ वृत्तांत जितुका झाला तो ॥३२॥ खरेपणीं आहे वर्म ॥ मिथ्यावादी होय न शर्म ॥ दैवें अन्यायसाफी होऊन ॥ मुक्त होतसे तो प्राणी ॥३३॥ तस्मात् जी खरी सत्यनीती ॥ त्यांत साहते बहु असती ॥ पांचांमुखीं बदूनि श्रीपती ॥ मुक्त करी अन्यायीं ॥३४॥ तस्मात् राहो अथवा जावो प्राण ॥ पुढें येवो कैसें घडून ॥ परी सत्य वाचे खरें भाषण ॥ वृत्तांत झाला तैसा वदूं ॥३५॥ मग चरणीं ठेवूनि भाळ ॥ उभय जोडूनि करकमळ ॥ म्लानमुख दीन विकळ ॥ वृत्तांत सकळ निरोपी ॥३६॥ म्हणे महाराजा क्षमाशीळा ॥ आपण जो कां प्रसाद दिधला ॥ परी अन्याय मजपासूनि झला ॥ भस्म गारी सांडिलें ॥३७॥ सांडिलें म्हणाल काय म्हणून ॥ तरी विश्वासें व्यापिलें नव्हतें मन ॥ भस्मानें पुत्र होईल कोठून ॥ ऐसे म्हणून सांडिले ॥३८॥ शेजारी असती बोलती जन ॥ दारा म्हणती प्रज्ञावान ॥ खरें नाहे निरुपण ॥ केले विचित्र तुजलागी ॥३९॥ तेणें संशय आणूनि मनीं ॥ नेणों कैसी घडेल करणी ॥ जठरीं पेटला कोपवन्ही ॥ तरी आपणचि भोगावा ॥४०॥ अपत्याकरितां परम अहित ॥ परगृहीं मिरवावें कां यथार्थ ॥ म्हणोनि गौप्य धरिलें चित्तांत ॥ समस्ती बदलीसे ॥४१॥ जन्मांत आल्या परोपकार ॥ करावा हें शास्त्रनिर्धारं ॥ न घडेल तरी उपकार ॥ अनुपकार करुं नये ॥४२॥ उत्तम वृक्षाची करावी लावणी ॥ न धडे तरी न टाकावा खंडुनी ॥ धर्म करावा न मेदिनीं ॥ वारुं नये कवणातें ॥४३॥ आपण स्वतां तीर्थासी जावें ॥ न घडे तरी परा न वारावें ॥ विवाहकार्य कदा न मोडावें ॥ आपुली बुद्धी वेंचुनियां ॥४४॥ गौतमीं करुं जातां चोरी ॥ तेथें वेचूं नये वैखरी ॥ तस्करातें मारितां अधिकारी ॥ आड त्यातें होऊं नये ॥४५॥ सुतापाशी पित्याचे अवगुण ॥ सांगूनि न करावें मन क्षीण ॥ सुनेपाशीं सासू हीन ॥ म्हणूं नये कदाचि ॥४६॥ कूप तडाग मळे बागाईत ॥ करतां वारुं नये कवणातें ॥ कोणी कीर्तनासी असतील जात ॥ आड येऊं नयें त्यासी ॥४७॥ आपुली वैखरी वेचल्यांत ॥ होऊं पाहे पराचे अनहित ॥ तरी ते विचारुनि स्वचित्तांत ॥ मौनें कांहीं न बोलावें ॥४८॥ ऐसें जाणोनि सरस्वती ॥ सत्य बोलली ती युवती ॥ कीं महाराजा विश्वास चित्तीं ॥ ठसला नव्हता त्या वेळे ॥४९॥ ऐसिया युक्तीप्रयुक्तीकरुन ॥ भावाभावी दृष्टी वेंचून ॥ जेणें जनाचें होय कल्याण ॥ तोचि अर्थ करावा ॥५०॥

म्हणूनि भस्माचे सांडवण ॥ मज दयाळा घडलें पूर्ण ॥ काय करुं दैवहीन ॥ उपाय तो अपाय झालासे ॥५१॥ कीं वाटे चालतां चाली ॥ धनाची ग्रंथिका पुढें आली ॥ परी दैवहीना बुद्धी संचरली ॥ अंध व्हावें तें समयीं ॥५२॥ कीं कल्पतरुच्या वृक्षाखाली ॥ कल्पिली कल्पना फळा आली ॥ कीं पिशाचवत बुद्धी संचरली ॥ दैवहीना शेवटीं ॥५३॥ तन्न्यायें मातें झालें ॥ आतां क्षमा करावी माउले ॥ अज्ञानापणें उडविलें ॥ हित माझें महाराजा ॥५४॥ परी ही ऐकतां वाणी ॥ मच्छिंद्र खिन्न झाला मनीं ॥ म्हणे स्त्रिया जाती पापरुपिणी ॥ अविश्वासाचें भांडार हें ॥५५॥ हिताहित कदा न जाणती ॥ भलतेसें पद ठेविती ॥ आपण बुडूनि दुसर्यापस बुडविती ॥ बेचाळीस पूर्वजांसी ॥५६॥ स्त्रियांसंगें लाभ किंचित ॥ कांही दिसेना सकळ अनहित ॥ उगाचि रावे भडाइत ॥ वृषभ जेवीं वनीचा ॥५७॥ उदयापासूनि सायंकाळ ॥ कष्ट अमित होती तुंबळ ॥ एक क्षणही चित्त शीतळ ॥ विश्रांतीतें मिळेना ॥५८॥ या विषयसुखाची परी ॥ मानावी जरी हदयांतरी ॥ तेथें होय स्वशक्तिबोहरी ॥ निर्बळपणी मिरवावें ॥५९॥ ऐसी जीवासी अवस्था होय ॥ मेलिया नरकामाजी जाय ॥ केल्या कर्माचे रुप फेडाया ॥ आचरण कांहीं नसेचि ॥६०॥ शिष्यपाप गुरुनाथा ॥ स्त्रीपाप भोगणें भर्ता ॥ तस्मात् जिकडे तिकडे पाहतां ॥ अनर्थाचें मूळ ती ॥६१॥ तस्मात् स्त्रियांचे बुद्धी लागे जन ॥ तो प्राणी गा प्रज्ञाहीन ॥ महामूर्ख अति मलीण ॥ दुष्कर्माचा भांडारी ॥६२॥ तन्न्यायें मी मूर्ख झालों ॥ या बाईच्या बोलीं लागलों ॥ वरदमंत्रभस्य ओपिलों ॥ सूर्यवीर्या आणोनी ॥६३॥ याउपरी आणीक वर ॥ मंत्रसंजीवनी आहे अमर ॥ सूर्यवीर्ये देहवर ॥ रचिला असेल कोठेंही ॥६४॥ तरी आतां ठाव सांडिला ॥ शोध करुनि पाहूं वहिला ॥ ऐसा मनीं विचार केला ॥ सरस्वतीतें बोलतसे ॥६५॥ म्हणे माय वो ऐक वचन ॥ घडलें घडो दैवयोगानें ॥ तरी सांडिलें भस्म तें ठिकाण ॥ मम दृष्टीसी दावीं कां ॥६६॥ तुजवरी क्षोभ करावा कांहीं ॥ तरी पदरीं कांही पडत नाहीं ॥ तरी सांडिला ठाव माझे आई ॥ निजदृष्टीं दावी कां ॥६७॥ ऐसे बोलतां नाथ वाणी ॥ भय फिटलें मुळींहूनी ॥ प्रांजळ चित्तें शुभाननी ॥ मुखचंद्रा उचंबळी ॥६८॥ म्हणे महाराजा योगद्रुमा ॥ सांडिला ठाव दावित्यें तुम्हां ॥ पुढें चाले उगमा ॥ नाथ जातसे सवें सवें ॥६९॥ तंव तो उकिरडा केर उद्दाम ॥ गोवर पडिला पर्वतासमान ॥ तेथें जाऊनि सुमधुम ॥ नाथाप्रती सांगतसे ॥७०॥ हे महाराजा तपाजेठी ॥ येथें सांडिली भस्मचिमुटी ॥ ऐसें ऐकोनि नाथ होटीं ॥ हांक मारी बालकातें ॥७१॥ हे हरीनारायण प्रतापवंता ॥ मित्रवर्या सूर्यसुता ॥ जरी असशील या गोवरांत ॥ नीघ त्वरित या समयीं ॥७२॥ या गोवरगिरींत नरदेहजन्म ॥ मिरवला असें तूतें उत्तम ॥ तरी गोरक्ष ऐसें तूतें नाम ॥ सुढाळपणीं मज वाटे ॥७३॥ द्वादश वर्षेपर्यंत ॥ बैसलासी गोवरक्षणार्थ ॥ म्हणूनि गोवररक्षक नाम तूतें ॥ पाचारितों स्वच्छंद्रें ॥७४॥ तरी आतां न लावी उशीर ॥ हे गोरक्षनाथा निघे बाहेर ॥ ऐसे वदतां नाथ मच्छिंद्र ॥ बाळशब्द उद्देला ॥७५॥ म्हणे महाराजा गुरुवर्या ॥ गोरक्ष असें मी या ठाया ॥ परी गोवरनगानें गुंफित काया ॥ भार मौळी विराजला ॥७६॥ तेणेंकरुनि शरीरवेष्टण ॥ झालें आहे दडपण ॥ तरी गौरीयातें विचारुन ॥ बाहेर काढीं महाराजा ॥७७॥ ऐसें ऐकूनि बोले उत्तर ॥ लौकरी आणून लोहपत्र ॥ मही विदारुनि नगगौर ॥ बाळतनू काढिली ॥७८॥ काढिली परी ती तनुलता ॥ बालार्ककिरणीं दिसे समता ॥ कीं घनमांदुसी विद्युल्लता ॥ चमक दावी आगळी ॥७९॥ कीं पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा ॥ दिशा उजळे समयीं निशीच्या ॥ तेवी तनुगर्म मदनाचा ॥ जगामाजी मिरवला ॥८०॥ कीं दुसरा ईश तो चक्रधर ॥ त्यजोनि आतां मूर्तिसार ॥ वीट मानूनी क्षीरसागर ॥ म्हणूनि येथें आला असे ॥८१॥ कुंकुमाकार पदपंकज ॥ सकळ आंगोळ्या तेजःपुंज ॥ चंद्राकारसम विराजे ॥ नखें अग्न आंगोळी ॥८२॥ घोटींव सुनीळ अपूर्व देखा ॥ कीं इंद्रनिळाची झळके बिका ॥ मनगटावरी अलौलिका ॥ सकळ पोटरी विराजे ॥८३॥ गुडघ्यावरी जानुस्थळ ॥ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ ॥ त्यावरी कटितटा अति निर्मळ ॥ हरिमाजासम जाणावी ॥८४॥ कटीवरती नाभिघाम् ॥ त्यावरतें हदय अति सुगम ॥ सुगम परी विद्याधाम ॥ ऐसेपरी वाटतसे ॥८५॥ सरळ बाहु स्कंधीं शोभत ॥ परी आजानबाहु दिसों येत ॥ तयामाजी जग समस्त ॥ उभ्या कर्दळी मिरवती ॥८६॥ त्यातेंही अंगुळ्या सरळ प्रकाम ॥ तयांअग्रीं नख उग्रतम ॥ चंद्राकृती तेज उत्तम ॥ कोर जैसी द्वितीयेची ॥८७॥ असो स्कंधामाजी ग्रीवा सकळ ॥ घोटितां बीक दावी सकळ ॥ तयावरी हनुवटी निर्मळ ॥ अधरोपरी शोभतसे ॥८८॥ अधर दंत जिव्हेसहित ॥ आनन केवळ चंद्र मूर्तिमंत ॥ परी आनन नोहे धाम निश्वित ॥ वेदधनाचें विराजे ॥८९॥ सरळ नासिका शुकाग्रवत ॥ उभय चक्षु विशाळवंत ॥ चक्षु नव्हेत ते शशिआदित्य ॥ नांदावया पातले ॥९०॥ भाळ विशाळ कबरी भार ॥ कुरळ वरती पिंगटाकार ॥ ऐसा महाराज सर्वेश्वर ॥ उदया आला वाटतें ॥९१॥ द्वादश वर्षे अलोलिक ॥ सर्वगुणी पाहतां बालक ॥ सरस्वतीनें भाळी देख ॥ तर्जनीतें लाविलें ॥९२॥ मनांत म्हणे ती गोरटी ॥ आहा जनीं मीच करंटी ॥ ऐसा पुत्र माझिये पोटीं ॥ येतां दैवें उच्छेदिला ॥९३॥ चित्तीं उठोनि परम तळमळ ॥ नेत्रीं दाटलें अपार जळ ॥ मोहें करपें हदयकमळ ॥ रुदनसंवादा अनुवादी ॥९४॥ तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे खेद कां वो करिसी व्यर्थ ॥ तुझा नव्हता तो सुत ॥ प्राप्त कैसा होईल ॥९५॥ पहा पहा अन्नयोग ॥ श्वान पराचा भक्षितो भाग ॥ परी उलटोनि रसनामार्ग ॥ श्वान दैवें विराजे ॥९६॥ तन्न्यायें मूर्तिमंत ॥ विभाग नसे हा ऐसा सुत ॥ आता शोक करिसी कां व्यर्थ ॥ नवशापविभाग मिरविसी ॥९७॥ तरी जा तूं येथूनी ॥ नाहक घेसील शापवाणी ॥ माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ॥ ब्रह्मादिकां साहेना ॥९८॥ ऐसी बोलिला क्रूर वार्ता ॥ सरस्वती पावली भय चित्ता ॥ मागें पाऊल ठेवूनि तत्त्वतां ॥ निजसदना पातली ॥९९॥ येरीकडे गोरक्षनाथें ॥ येऊनि वंदिलें गुरुपदातें ॥ मच्छिंद्रनाथ तो प्रसन्नचित्तें ॥ अनुग्रह ओपितसे ॥१००॥

ॐ इति एकाक्षर अक्षर ॥ संबोधीत समग्र ॥ नारायणीं नामोच्चार ॥ मंत्रविधीनें निरोपिला ॥१॥ वरदहस्त ठेवूनि मौळीं ॥ सकळ निवटिली अज्ञानकाजळी ॥ वरदविभूती चर्चूनि भाळीं ॥ मुख कुरवाळी प्रेमानें ॥२॥ मग हस्त धरोनि तत्त्वतां ॥ म्हणे तान्हुल्या ऊठ आतां ॥ महीचे गोचर करुनि तीर्था ॥ हरिपरायणा सकामातें ॥३॥ अवश्य म्हणूनि गोरक्षनाथ ॥ सलीन चरणीं माथा ठेवित ॥ श्रीमच्छिंद्राचा धरुनि हस्त ॥ गमन करिता पैं झाला ॥४॥ चंद्रागिरींस्थान सोडूनि ॥ करिती जगन्नाथीं गमन ॥ तों मार्गी जातां एक ग्राम ॥ कनकगिरि लागला ॥५॥ मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस ॥ बोलतां झाला गोरक्षास ॥ बा रे प्रारंभ क्षुधेस ॥ जठरामाजी दाटला ॥६॥ कक्षेमाजी घालूनि झोळी ॥ बा रे संचरोनी वस्तिमेळीं ॥ भिक्षा मागूनि ये वेळीं ॥ क्षुधा माझी हरी कीं ॥७॥ अवश्य म्हणूनि गोरक्षनाथ ॥ सत्वर झोळी कक्षे घेत ॥ संचरोनि कनकग्रामांत ॥ भिक्षा मागे घरोघरीं ॥८॥ भिक्षा मागतां अति उद्देशीं ॥ तंव तो गेला एका विप्रगृहासी ॥ तेथें पाहतां ते दिवशीं ॥ पितृश्राद्ध मिरवलें ॥९॥ विप्र करुनियां भोजन ॥ उपरी मागत्यासी देतसे अन्न ॥ ते संधीसी गोरक्ष जाऊन ॥ ‘ अलक्ष ‘ जल्पतसे ॥११०॥ तंव त्या घरची नितंबिनी ॥ महाप्राज्ञिक सुस्वरुपिणी ॥ क्षमाशांतीची लावण्यखाणी ॥ सर्वगुणीं संपन्न ॥११॥ तिनें पाहतां गोरक्षनाथ ॥ भाविती झाली चित्तांत ॥ म्हणे धन्य हें बाळ अतित ॥ चांगुलपर्णी मिरवतसे ॥१२॥ प्रत्यक्ष मातें भासे कैसा ॥ कीं बालर्कतनूचा ओतिला ठसा ॥ कीं हरुनि चपळेचें मांदुसा ॥ महीलागीं उतरला ॥१३॥ परी हा तापसी योगी वरिष्ठ ॥ मातें भासतो योग हा श्रेष्ठ ॥ पूर्वीचा कोणी योगभ्रष्ट ॥ जगामाजी मिरवतसे ॥१४॥ ऐसें जाणूनि लवडसवडी ॥ पात्रीं पदार्थ स्वकरें वाढी ॥ अन्नसामग्री अति तांतडी ॥ घेऊनि आली भिक्षेसी ॥१५॥ खाज्या करंज्या पदार्थ धिवर ॥ पोळी भात शिरा कचोर ॥ मालुपुव्यादि सुकुमार ॥ परम मृदू भक्ष्य तो ॥१६॥ चोटी मुगदळ बुंदी विशेष ॥ पूर्ण पोळिया विस्तीर्ण पात्रास ॥ धान्या पुर्याु पंच मधुरस ॥ श्रद्धापूर्ण ठेविल्या ॥१७॥ वड्या पातवड्या शाखा बहुत ॥ सौभ्यमठ्ठकाचे द्रोण थरित ॥ कोशिंबिरी आंबेरायतें ॥ बहु भात चटणिया ॥१८॥ कढी सांबारें वडी त्यांत ॥ सार आमटी चणचणीत ॥ नाना द्रोण भरुनि घृत ॥ मेतकुटादि वाढिलें ॥१९॥ मध्यभागीं ठेवूनि भात ॥ त्यावरी वरण कनकवर्णात ॥ तळीं वडे पोखरे दह्यांत ॥ घालोनियां वाढिलें ॥१२०॥ ऐसियापरी षड्रसान्न ॥ घवघवीत पात्र वाढून ॥ श्रीगोरक्षापुढें ठेवून ॥ नमस्कारी प्रीतीनें ॥२१॥ गोरक्ष पाहतां पात्र सुरस ॥ मनीं वाटला परम हर्ष ॥ चित्तीं म्हणे त्या नितंबिनीस ॥ धन्य धन्य माउले ॥२२॥ अहा आम्ही कोठील कोण ॥ नोहे इष्ट सोयरे जन ॥ आम्हासाठीं सिद्ध करुन ॥ पात्र वाढून आणिलें ॥२३॥ पात्र पहा घवघवीत ॥ हें पात्र नोहें यथार्थ ॥ शिवलिंगी शोभला भात ॥ पात्र शाळुंका मिरवली ॥२४॥ नाना पदार्थ अर्थप्रकरण ॥ तें शिवासी अपार सुगम ॥ कीं शिवलाखोली ढांसळून ॥ शाळुंकाते मिरविली ॥२५॥ कीं प्रीतीं पाहतां तो भात ॥ सकळ अन्नाचा प्रभु शोभत ॥ पात्रमहीतें प्रीतीनें बहुत ॥ नाना पदार्थ मिरवलें ॥२६॥ तरी शाक नोहे पुतनावेळ ॥ खाजें मंत्री दिसे सकळ ॥ मौळीं छत्र तेजाळ ॥ वरान्न हें मिरविले ॥२७॥ ऐसा भास भासूनि हदयीं ॥ पात्र कक्षझोळीन ठेवी ॥ आशीर्वचने तोषवूनि बाई ॥ जाता झाला महाराज ॥२८॥ चित्तीं म्हणे उदरापुरतें ॥ प्राप्त अन्न झालें मातें ॥ आतां वेंचूनि स्वकष्टातें ॥ केवीं हिंडावें घरोघरीं ॥२९॥ ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ येऊनि वंदिलें श्रीगुरुमूर्ती ॥ भिक्षाझोळी ॥ कक्षेंतूनि निगुते ॥ काढूनि ठेवी पुढारां ॥१३०॥ तंव ती प्रत्यक्ष तपोमौळी ॥ विकासूनि पाहे झोळी ॥ तंव तें अन्न सुंदर परिमळीं ॥ निजदृष्टीं देखिलें ॥३१॥ मग तें घेऊनि आपुलेपासीं ॥ भोजन करी योगींद्र तापसी ॥ अन्न स्वादिष्ट रसनेसी ॥ लागतां भक्षी आवडीनें ॥३२॥ मुखामाजी कवळ करितां ॥ रसना न लावी दंतां ॥ म्हणे दे तरकी होतील आतां ॥ लवडसवडी लोटीतसे ॥३३॥ जठरभांडारीं भरुनि भरतें ॥ आणीक इच्छे नाहीं पुरतें ॥ परी सर्व पदार्थ कामनायुक्त ॥ वंडा प्रिय मिरवला ॥३४॥ परी पदार्थ अपूर्वपणीं ॥ कामना येथें राहिली मनीं ॥ कीं वडा आणीक असतां भोजनीं ॥ चांगुलपणा मिरवितो ॥३५॥ ऐसी चित्तीं कल्पना आणून ॥ पाहता झाला गोरक्षवदन ॥ तों सच्छिष्य ओळखून ॥ बोलता झाला गुरुसी ॥३६॥ म्हणे महाराजा तपोधना ॥ कवण कामना आली मना ॥ तो अर्थ उघड दावूनि वचना ॥ आम्हां कार्या निरोपावें ॥३७॥ येरु म्हणे गोरक्षनंदना ॥ कामना वेधली माझिया मना ॥ आणिक वडा असता भोजना ॥ तृप्त चित्तीं मिरवतों ॥३८॥ ऐसें ऐकोनि गुरुचें चोज ॥ म्हणे गुरुराजा महाराज ॥ आतांचि वडा आणूनि सहज ॥ तुम्हांप्रती देईन मी ॥३९॥ ऐसें म्हणूनि तात्काळिक ॥ उठता झाला तपोनायक ॥ विप्रगृहीं येऊनि देख ॥ मारी हांक गोरक्ष तो ॥१४०॥ म्हणे माय वो माय आतां ॥ आणिक वडा दे तत्त्वतां ॥ मम गुरुची कामना असे चित्ता ॥ तृप्ती अस्तातें पावेना ॥४१॥ तंव ते बोले नितंबिनी ॥ आलासी गुरुचें निमित्त करोनी ॥ परी सकामसविता स्वेच्छापणीं ॥ हदयापात्रीं हेलावे ॥४२॥ मातें दावूनि गुरुभक्ती ॥ कामने करुं पाहसी तृ[ती ॥ तस्मात् सकळ अर्थ कळूं आला चित्तीं ॥ मजलागीं जाण पां ॥४३॥ येरु म्हणे जननी ऐसें ॥ कामनीं वेधलें नाहीं मानस ॥ गुरुइच्छा कामउद्देश ॥ पाहूं आलों त व ठाया ॥४४॥ तंव ती बोले विप्रनंदिनी ॥ गुरुअर्थ काम मी ॥ वेधली म्हणतोसी तरी प्राज्ञी ॥ वन माजें ऐकावें ॥४५॥ अगा मम भक्तीचे प्रसंगेंकरुन ॥ तूतें दिधलें पहा वाढून ॥ पुन्हां आलासी मागून ॥ तरी तें नाहीं फुकाचें ॥४६॥ येरु म्हणे तरी त्यास ॥ काय लागतें सांग आम्हांस ॥ तेंचि देऊनि तूतें खास ॥ वडे जाण इच्छितों ॥४७॥ येरी म्हणे गुरुभक्ती ॥ मातें दावूं पावलासी शक्ती ॥ परी वडे अन्नावरते पाहिजेत ॥ डोळा काढूनि देई कां ॥४८॥ येरु म्हणे काय कठिण ॥ चक्षुकामनीं वेधलें मन ॥ तरी चक्षु आतां देईन जाण ॥ उशीर नसे या कार्या ॥ ॥४९॥ ऐसें बोलुनि केलें कौतुका ॥ तत्काळ अंगुळी अनामिका ॥ चक्षुद्वारी घालोनि देखा ॥ बाहेर काढिलें बुबुळातें ॥१५०॥

बुबुळगोळ वामकरतटी ॥ ठेवितां लोटला रुधिर पाटी ॥ जैसा नगीं झरा लोटीं ॥ अकस्माद उदभवलासे ॥५१॥ कीं मांदारनदी स्वर्गीहुनी ॥ उत्तरे मनकर्णिकेचे जीवनीं ॥ तन्न्यायें चक्षुद्वाराहूनी ॥ लोटे लोटला रुधिराचा ॥५२॥ म्हणावी ती रुधिर नोहे शक्ती ॥ दाखवूं पातली गुरुभक्ती ॥ विप्रकामना पात्र भरुनि ॥ जीवनभागीरथी दाविली ॥५३॥ कां ते जाया हेलनभाव ॥ ती सागराची मिरवली ठेव ॥ तदर्थ जीवनभागिरथीराव ॥ गोरक्षनगीची आणिली असे ॥५४॥ असों ऐसें तेणें रुधिरा ॥ लोट लोटला महीवरा ॥ तें पाहूनि चिंतातुरा ॥ प्रेमें जाया मिरवली ॥५५॥ रुधिर वाहतां भडभडाट ॥ महीं लोटला रक्तपाट ॥ खंडणा नोहे परम अचाट ॥ भूषण मिरवी लोकातें ॥५६॥ तरी तो पाहतां रुधिरपाट ॥ नोहे धरादेवीचा शुद्ध मळवट ॥ भाळीं चर्चूनि कुंकुमपाट ॥ भूषण मिरवी लोकांतें माजी परतली ॥५८॥ चित्तीं म्हणे हा अहाहा कैसें ॥ बोलतां झालें विपर्यासें ॥ धन्य हा एक शिष्य असे ॥ जगामाजी मिरवला ॥५९॥ अहा कैसें केलें धैर्यपण ॥ बोलतांचि काढिला जेणें नयन ॥ परी ती व्यापूनि भयसंपन्न ॥ म्लानवदन मिरवली ॥१६०॥ मग वडे घेऊनि सातपांच ॥ देऊं पातली लगबगें साच ॥ पुढें ठेवूनि वदे वाचे ॥ ऐक्याथें करी भावार्थ ॥६१॥ उपरी जोडूनि उभय पाणी ॥ विनंती करी म्लानवदनीं ॥ म्हणे महाराजा सहजबाणी ॥ शब्द माझा उदेला ॥६२॥ परी उदय होतां न लावितां वेळ ॥ तुम्ही बाहेर काढिलें बुबुळ ॥ परी मम अन्यायी शब्द केवळ ॥ क्षमापात्रीं मिरवणें ॥६३॥ तुम्ही कृपाळू संपूर्ण ॥ बैमतां अंगीं क्लेश धरुन ॥ परी तितुकें दुःख पराकारण ॥ देऊं ऐसें वाटेना ॥६४॥ कीं कमळ करी अस्तसमयीं ॥ घ्यावया विद्रा इच्छा घेत हदयी ॥ परी तें दुःखप्रवाही ॥ कदाकाळी मिरवेना ॥६५॥ शेवटीं आपण पावोनि मरण ॥ परातें कळिके सुख ओपून ॥ राहे तन्न्यायें करुन ॥ तुम्ही संत आहाती ॥६६॥ उपरी बोले गोरक्षनाथ ॥ तूं किमर्थ झालीस भयभीत ॥ वडे अन्न तत्प्राप्त्यर्थ ॥ चक्षु दिधला म्यां आपुला ॥६७॥ तरी तूं भयभीत न होई सकळ ॥ स्वकरीं माझें विराजे बुबुळ ॥ येरी म्हणे तपस्वी स्नेहाळ ॥ कृपा करीं मजवरी ॥६८॥ इतुकें देऊनि मातें दान ॥ बुबुळासहित नेईजे अन्न ॥ आपुलें कार्य संपादून ॥ क्षमा वाढवीं आमुतें ॥६९॥ ऐसें ऐकूनि गोरक्षनाथ ॥ म्हणे तूं न होई भयभीत ॥ बुबुळासह वडे अन्नातें ॥ घेऊनियां चालिलो ॥१७०॥ चक्षूसी आडवोनि पदर ॥ जावोनि उभा राहिला गुरुसमोर ॥ वाचे बोले नम्रोत्तर ॥ इच्छा पूर्ण करा जी ॥७१॥ परी तो कनवाळु मच्छिंद्रनाथ ॥ सच्छिष्याचें मुख पाहत ॥ तंव वसनपदर चक्षूवरतें ॥ घेऊनियां मिरवला ॥७२॥ तें पाहूनि चक्षुवसन ॥ म्हणे चक्षू झांकिला केवीं वसनें ॥ येरु म्हणे उगेच करुन ॥ चक्षु वसनें धरियेला ॥७३॥ मनांत कल्पी गोरक्षनाथ ॥ जरी मी यातें करीं श्रुत ॥ तरीं धिक्करुनि वडे अन्नासहित ॥ दुःखप्रवाहीं मिरवेल ॥७४॥ जेसा श्रावणाचा अंतकाळ ॥ ऐकतां न सेविती वृद्ध तेथें केवळ ॥ तन्न्यायें येथें केवळ ॥ दुःखसरिता लोटेल ॥७५॥ म्हणूनि पुसतां गुरुंनीं वचन ॥ बोले श्रीगुरुतें गौप्य धरुन ॥ सहजस्थिती चक्षुवसन ॥ धरिलें असें महाराजा ॥७६॥ येरु म्हणे बा मुखकमळा ॥ प्रत्यक्ष पाहूं दे माझिया डोळां ॥ येरु म्हणे गुरुस्नेहाळा ॥ भोजन झालिया दाखवीन ॥७७॥ मी तों असतां सहजस्थिती ॥ कीं परी उगलाच नयन केउतगती ॥ ठणका उठला चक्षुप्रती ॥ आला की काय कळेना ॥७८॥ तरी तें दावूनि चक्षुद्वार ॥ परम दिसेल अपवित्र ॥ किळस बाधील भोजनोत्तर ॥ चक्षु पहावा महाराजा ॥७९॥ येरु म्हणे बा न घडे ऐसें ॥ आधीं पाहुनि तव मुखास ॥ नंतर सारुं भोजनास ॥ दुःख तुझें हरोनियां ॥१८०॥ जरी तूं करिसी अनमान ॥ तरी प्रत्यक्ष गोमांसमान ॥ मानीन हें अन्न निश्वय जाण ॥ चक्षु आधीं दावी कां ॥८१॥ ऐसें ऐकतां निर्वाणवचन ॥ गोरक्ष बोले श्रीगुरु कारण ॥ कीं मागूं गेलों वडेअन्न ॥ कथा झाली ती ऐका ॥८२॥ जया घरीं वडेअन्न तेथील सद्भक्ति आहे कामिन ॥ तिनोंचे प्रथम दिधलें अन्न ॥ मागूनि गेलों दुसर्या८नें ॥८३॥ तुमची इच्छा काम दावून ॥ म्यां मागितले बडेअन्न ॥ तंव ती बोलली मजकारण ॥ गुरुभक्त म्हणविसी ॥८४॥ तरी तूं काढूनि देई डोळा ॥ मग वडे देईन बाळा ॥ ऐसे बोलतां तर्जनी बुबुळा ॥ खोवूनियां काढिलें ॥८५॥ तरी हा अन्याय घालूनि पोटीं ॥ मातें करावी कृपादृष्टी ॥ ऐसें ऐकतां तपोजेठी ॥ परम चित्तीं तोषला ॥८६॥ मग चक्षुरद्वाराहूनि वसन ॥ हस्तें काढी मछिंद्रनंदन ॥ तो रुधिरप्रवाह अति दारुण ॥ चक्षुद्वारा येतसे ॥८७॥ मग बोले मच्द्रिनंदन त्यातें ॥ बुबुळ कोठें सांग मातें ॥ येरु काढूनि स्वहस्तें ॥ गुरुनाथा दर्शवी ॥८८॥ मग तो प्रतापी योगद्रुम ॥ मंत्रसंजीवनी आराधोनि नेम ॥ सवितातेज बुबुळधामी ॥ मंत्रप्रयोगी स्थापिलें ॥८९॥ पूर्णमंत्राचा होतां पाठ ॥ बुबुळ संचरले चक्षुकपाट ॥ मग पूर्वस्थितीहूनि अचाट ॥ तेजालागीं मिरवलें ॥१९०॥ मग अंकीं येऊनि गोरक्षनाथ ॥ स्वकरें मुख कुरवाळीत ॥ म्हणे धन्य धन्य बा महिंत ॥ तूंचि एक सच्छिष्य ॥९१॥ मग त्यासी घेऊनि अंकावरी ॥ सच्छिष्यासह भोजन करी ॥ परी धैर्यशक्तींची अपार लहरी ॥ मच्छिंद्रदेहीं मिरवतसे ॥९२॥ झालिया सांगोपांग भोजन ॥ गोक्षरकासी बोले मच्छिंद्र जाण ॥ बा रे तव भक्ति पाहून ॥ परम चित्तीं संतोषलों ॥९३॥ तरी मजपासींचें विद्याधन ॥ हदयीं साठवीं ठेवून ॥ मग अस्त्रविद्या दत्रात्रेयदेणे ॥ सकळ तूते निरोपीन ॥९४॥ कवित्वविद्या साबरी सबळ ॥ तीही विद्या अर्पिली सकळ ॥ एक मास करुनि वस्तीस्थळ ॥ विद्येचा अभ्यास केला पैं ॥९५॥ असो आतां निरुपण ॥ पुढले अध्य़ायीं धुंडीनंदन ॥ मालू सांगेल श्रोत्यांकारण ॥ नरहरिप्रसादेंकरुनियां ॥९६॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ स्मंत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ नवाध्याय गोड हा ॥१९७॥ अध्याय ९ ॥ ओव्या ॥१९७॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ नवनाथभक्तिसार नवमाध्याय समाप्त ॥

Navnath Bhaktisar Adhyay 9 PDF Download:

Loading Viewer...

If You Like This Article, Then Please Share It

DISCLAIMER:

The information on this website is for informational purposes only. We do not guarantee the accuracy of the content.

All views expressed are personal and should not be considered professional advice. Please consult a qualified expert for guidance.

We are not responsible for any actions taken based on the information provided here.